विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या सुरूवातील काँग्रेस नेत्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या मंत्री सायकल चालवत विधानभवनात आले.
यावेळी काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदारही उपस्थित होते. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार प्रणिती शिंदेदेखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.