कॉंग्रेस धक्का ; जिल्हा बँक घोटाळाप्रकरणामुळे आ. सुनील केदार यांची आमदारकी रद्द
Nagpur: काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार सुनील केदार (Sunil kedar) यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात आ. सुनील केदार यांच्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात केदार हे दोषी आढळले होते. यापार्श्वभूमीवर त्यांना ५ वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर आता त्यांचं विधानसभा सदस्यत्व ही रद्द करण्यात आलं आहे. आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेमुळे काँग्रेसला (congress)विदर्भात मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार सुनील केदार यांना शिक्षा झाली आहे. न्यायालयानं त्यांना ५ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानं त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द झालं आहे. त्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे.
सुनील केदार यांची जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषदांवर त्यांचा दबदबा आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडा साफ होत असताना देखील केदार हे विजयी झाले होते. बाकी सगळ्या जागांवर काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत केदार यांच्या शिक्षेमुळे भाजपला विदर्भात मोठा फायदा होणार आहे.