सोनिया गांधी यांच्या सचिवावर बलात्काराचा आरोप, महिलेने व्हिडीओ जारी करत मागितली मदत

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव पी पी माधवन यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने दोन महिन्यापूर्वी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली होती. त्या महिलेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.;

Update: 2022-08-30 02:34 GMT

सदर महिलेचा हा व्हिडीओ १ मिनिट ३७ सेकंदाचा असून सदर महिला या व्हिडीओमध्ये तक्रार परत घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचं सांगत आहे. तसंच पोलिस आरोपीला वाचवत असल्याचं ती या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

सोनिया गांधी यांच्या सचिवावर बलात्काराचा आरोप करणारा हा व्हिडीओ उजव्या विचारसरणीच्या लोकांनी, अनेक पत्रकारांनी सोशल मीडियावर ट्वीट केल्याचं पाहायला मिळत आहे.

उदय ठाकुर या ट्वीटर हँडलवरून म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्या खासगी सचिवावर एका महिलेने बलात्काराचे आरोप करत व्हिडीओतून मदत मागितली आहे. त्यामुळे किती सनातनी बंधू भगिनी हा आवाज दूरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतील? असा सवाल उपस्थित केला आहे. 

सोनिया गांधींचे पीए पीपी माधवन यांनी लग्नाचं आश्वासन देऊन माझ्यावर बलात्कार केला. या संदर्भात मी एफआयआर उत्तम नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यांना वाचवण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत माझ्याकडे पुरावे मागितले गेले नाहीत. माझ्या प्रकरणाचा तपास अधिकारी (IO) बदलण्यात आला. मला सांगण्यात आले नाही. चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. मला सांगितले गेले नाही. माझ्यावर जुबेर अहमद या वकिलाने तक्रार/एफआयआर मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचं ती या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

सदर महिला पुढे म्हणते माझा पोलिसांवर अजिबात विश्वास नाही. मला मदत करा, असं ती या व्हिडीओत सांगत आहेत.

सदर महीला सांगते तिचा नवरा कॉंग्रेस कार्यालयात होर्डिंग्ज काम करायचा. दोन वर्षापुर्वी त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिलेने नोकरीसाठी पी पी माधवन यांच्याशी संपर्क केला.

FIR मध्ये सदर महिलेने पी पी माधवन यांनी 21 जानेवारी 2022 मध्ये पहिल्यांदा घरी बोलावले होते. माधवन यांनी त्यांच्या बायको शी फारकत झाली असल्याचं तिला सांगितल्याचं सदर महिला सांगते. या दरम्यान अनेक वेळा तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचा आरोप तिने या एफआयआर मध्ये केला आहे.

माधवन यांचे म्हणणं काय?

मी महिलेला ओळखतो. पण महिलेने केलेले आरोप चुकीचे आहेत. असं माधवन यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News