सध्या राज्यातील सर्व राजकारण हे शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या अवती भोवती फिरतंय. बुधवारी उध्दव ठाकरे हे त्यांचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख असा उल्लेख करणं टाळंलं होतं पण त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र उध्दव ठाकरे यांचा शुभेच्छा देताना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला एका मागोमाग एक हादरेच बसत आहेत. आधी ४० आमदार मग १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांचंच नेतृत्व मान्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नेमकी शिवसेना कुणाची उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची असा प्रश्न आ वासून उभा असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे य़ांचा ६१ वा वाढदिवस आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्या शुभेच्छा देताना त्यांनी ट्विट मध्ये उध्दव ठाकरेंचा पक्षप्रमुक असा उल्लेख करणं टाळलं होचं. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देताना नेमकं, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....", असं म्हटलं होतं. म्हणजेच एकनाथ शिंदेंनी त्यांच्य़ा ट्विटमध्ये उ्ध्दव ठाकरेंचा उल्लेख राज्याचे माजी मुख्यमंत्री असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. उध्दव ठाकरेंना ते पक्षप्रमुख मानतात की नाही असा प्रश्न उपस्थित राहतो.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
पण त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र आपल्या वडिलांपेक्षा वेगळं ट्विट करत उध्दव ठाकरे यांचा शुभेच्छा देताना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे. एकंदरीत श्रीकांत शिंदे आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे पाहुयात. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये, "पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....", असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्य़ा आहेत.
पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.... pic.twitter.com/ZNfraw8cm9
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) July 27, 2022
जिथे त्यांचे वडील व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंना साधं पक्षप्रमुख म्हणणं नाकारलं तिथे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात भुमिका घेत फक्त पक्षप्रमुखच नाही म्हणाले तर त्यांचा फोटो देखील पोस्ट केला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटप्रमाणे इतर बंडखोर आमदार आणि खासदारांनीही उध्दव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणण्याचं टाळलं. तिथे श्रीकांत शिंदे ट्विट पाहता त्यांना आपल्याच वडिलांचं नेतृत्व मान्य नाही का? असा सवाल उपस्थित होतो. पण दुसरीकडे जर पाहिलं तर ज्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं होतं त्यामध्ये स्वतः श्रीकांत शिंदे देखील होते. मग आता या पिता पुत्रामध्ये बेबनाव आहे की ही एकनाथ शिंदे यांची कोणती नवी खेळी आहे असे अनेक प्रश्न या एका ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत. दरम्यान या सर्व बंडखोर आमदार आणि खासदारांच्या शुभेच्छा उध्दव ठाकरे यांनी नाकरल्या आहेत.