दु:खद बातमी; काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन
गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर होते. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः लक्ष ठेवून होते.
सातव यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आल्याच टोपे यांनी शनिवारी माहिती दिली होती. मात्र आज सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.