ब्रिजभूषण सिंह यांना पैसे घ्या आणि मेडल खरेदी करून दाखवा, काँग्रेस खासदार हुड्डा यांचं थेट आव्हान
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तथा बाजपचे खासदार ब्रिजभूषणसिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी पुकारलेल्या आंदोलनाच्या आखाड्यात आता राजकीय नेत्यांनीही उड्या मारायल्या सुरूवात केलीय.;
भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी 15 रूपयांत मेडल मिळत असल्याचं वक्तव्यं केलं होतं. त्याअनुषंगानं आज काँग्रेसचे खासदार दीपेंद्रसिंह हुड्डा यांनी ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर दिलंय. हुड्डा म्हणाले, " देशातील नागरिक आणि काँग्रेस पार्टी पैसे देईल, ब्रिजभूषण सिंह यांनी ऑलिंम्पिक मेडल खरेदी करून दाखवावे, असं आव्हानचं हुड्डा यांनी ब्रिजभूषण सिंह यांना दिलंय.
हुड्डा पुढे म्हणाले, " आपल्या देशात प्रत्येक मुलींची इज्जत ही आपल्या देशाची इज्जत आहे. 7 मुलींनी तक्रार करूनही भाजप सरकार आरोपी ब्रिजभूषण सिंह यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. याआधी बेटी बचाव बेटी पढाओ असं बोललं जायचं आता मात्र 'BJP नेताओ से बेटी बचाओ' असं बोललं जातं आहे. कारण भारतात जर मुलींवर अत्याचार झाले तर भाजप सरकार त्यांना न्याय मिळवून देणार नाही, असं देखील दीपेंद्रसिंह हुड्डा म्हणाले.