Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत चालताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर जखमी

Update: 2022-11-17 09:21 GMT

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. यावेळी चालताना माजी मंत्री यशोमती ठाकूर जखमी झाल्या. मात्र जखमी झाल्यानंतरही जिद्दीने पुढील प्रवास पुर्ण केला.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत चालताना काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना गर्दीत धक्का लागला. धक्का लागल्याने यशोमती ठाकूर खाली पडल्या. यावेळी त्यांना किरकोळ जखम झाली. यानंतर राहुल गांधी यांनी यशोमती ठाकूर यांना आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र यशोमती ठाकूर यांनी जिद्दीने प्रवास पुर्ण केला.

गुरूवारी सकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथून यात्रेला सुरवात झाली. त्यावेळी यात्रेमध्ये गर्दी उसळली. याच गर्दीत यशोमती ठाकूर यांना धक्का लागला आणि त्या जमीनवर पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्या हाताला खरचटल्यामुळे सूज आली. तरीही न थांबता त्यांनी पदयात्रेतील पायी प्रवास पूर्ण केला.

याबाबत यशोमती ठाकूर यांनी आपल मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या "आयुष्यात अनेक धक्के सहन केले आहेत. अशा छोट्या धक्क्याने काहीच फरक पडत नाही." त्यामुळे काहीही झालं तरी भारत जोडो यात्रेशी प्रत्येकजण एकनिष्ठ असल्याचे आपल्याला उदाहरण पाहायाला मिळत आहे.

Tags:    

Similar News