भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेस पक्षाने "INC TV" नावाचं यूट्यूब चॅनल लॉन्च केलं होतं. त्या चॅनलचं प्रसारण उद्या दिनांक 24 एप्रिल पासून सुरु होणार आहे. चॅनलच्या अधिकृत ट्वीटर अकांउटवरुन ही घोषणा करण्यात आली आहे.
पक्षाच्या मते पक्षाचा आवाज मो्ठ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चॅनल सुरु केलं आहे. या चॅनलचा पहिला शोमध्ये कॉग्रेस पक्षाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील गांधींजीच्या भूमिकेवर एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. ज्यामध्ये महात्मा गांधी आणि त्यांच्यावर लिहिलेल्या वृत्तपत्रांच्या कटींगचा वापर करण्यात आला आहे.
अलिकडे देशातील माध्यमं विरोधी पक्षाची भूमिका दाखवत नाहीत. असा आरोप कॉंग्रेस सातत्याने करत असून त्याचाच एक भाग म्हणून कॉंग्रेसने आता स्वत:चं माध्यमं सुरु केलं आहे.
INC TV का प्रसारण कल दोपहर 12 बजे से शुरू होगा।
— INC TV (@INC_Television) April 23, 2021
ज़्यादा जानकारी के लिए कृपया हमारे साथ बने रहें।