मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकातील हिंदुत्वाबाबत केलेल्या लिखाणाबाबत असहमती दर्शवली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. हिंदुत्वाची तुलना ISIS शी केली जाऊ शकते, हे चुकीचे आहे आणि अतिशयोक्ती असल्याचे, गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकात हिंदुत्वाबद्दल जी मतं मांडली आहेत, त्याच्यावरून सध्या देशात वादंग पेटले आहे.
खुर्शीद यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत आझाद यांनी ट्विट केले की, "हिंदू धर्माच्या मिश्र संस्कृतीपासून वेगळे असलेली राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्वाशी आम्ही असहमत असलो, तरी ISIS आणि जिहादी इस्लामशी हिंदुत्वाची तुलना करणे हे वास्तवात चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे.'
In Mr. Salman Khursheed's new book, we may not agree with Hindutva as a political ideology distinct from composite culture of Hinduism, but comparing Hindutva with ISIS and Jihadist Islam is factually wrong and an exaggeration.
— Ghulam Nabi Azad (@ghulamnazad) November 11, 2021
आझाद हे काँग्रेसच्या 'G23' गटाचे प्रमुख नेते आहेत. खुर्शीद यांनी अनेक प्रसंगी उघडपणे या गटावर टीका केली आहे, त्यांना गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जाते.