मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. पण देशाच्या अन्नदात्याबाबत केंद्र सरकार संवेदनशून्यपणे वागत असल्याची टीका करत काँग्रेसनेही आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. केंद्राचे तिन्हरी काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यासाठी राज्यभरात काँग्रेस नेत्यांनी एकदिवसीय उपोषण करत केंद्र सरकारचा निषेध केला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यसभऱरात आंदोलन केले. शेतकरी दिल्लीच्या वेशीवर बसले आहेत. त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. जे लोक आज सत्तेत आहेत त्यांनीच पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर आंदोलन केले होते, आज मात्र ते बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे रद्द झाले पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत अशी भूमिका महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मांडली.