राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई पब्लिक स्कूलच्या CBSE बोर्डाचा लाकार्पण सोहळ्यासाठी बोरीवलीत उपस्थित होते. यावेळी त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच कॉलेज सुरू करणार असल्याची माहिती दिली. याशिवाय कोरोना संपेपर्यंत मुंबईतील शाळा देखील बंदच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे मुंबईतील शाळा बंदच आहेत. सद्यस्थितीत राज्यातील मुंबई, ठाणे आणि भोवतालचा काही परिसर सोडला तर काही ठिकाणी कोव्हिड चा प्रभाव पाहुन शाळा सुरू आहेत. गेल्या दीड वर्षाच्या काळात शालेय तसेच महाविद्यालय़ीन विद्यार्थ्यांचे शिक्षण हे पुर्णतः ऑनलाईन माध्यमातून होत आहे.