पुन्हा लॉकडाऊन नाही: मुख्यमंत्री
"युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण करोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे." असा इशारा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना सावध राहा, असा सल्ला दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केलं. काय करायला हवे ते आपण आपण अनुभवातून शिकलो आहोत. प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणे कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनावर लस आली तरी मास्क लावणे बंधनकारक राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. कोविड सुरू झाला तेव्हा भेटींची वारंवारता जास्त होती. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितले आहे की लस आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते ६ महिने तरी मास्क लावावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले. सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण त्याची गरज नाही. बहुतांशी लोक सूचनाचे पालन करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ७०-७५ टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. परदेशातुन येणार्या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परत कसे थांबवायचे? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अनेक जण आता मास्क लावून फिरतायत. काळजी घेतायत. परंतु काही लोकं हे काळजी घेत नाहीयेत. परंतु त्यांच्यामुळे इतरांना धोका निर्माण झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी येताना जाताना मास्क हे शस्त्र आहे हे लक्ष ठेवा, नव्या वर्षाचं स्वागत करतना सावध राहा. आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यात कुटुंबीयांना आमंत्रण द्या पण करोनाला देऊ नका याची काळजी घ्या. सावधानता बाळगणं आवश्यक आहे,
लग्नसराई सुरू झाली की 'यायच हं!' असे आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. माता भगिनींना परत सांगतो, आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून केला आहे. तो का करावा लागला? त्याची कारणे आहेत. आपल्याकडे सण गेले परंतु आता नविन वर्ष येत आहे. कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसे विषाणूने रुप बदलले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.