होय, मी अहंकारी: मुख्यमंत्री
मुंबई मेट्रोच्या कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरून विरोधाकांनी महाविकास आघाडीला घेरले असताना हे प्रकरण आता न्यायालयातही गेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मुंबई मेट्रो आणि कारशेडच्या प्रस्तावित जागेवर भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी कद्रुपणा सोडा आणि चर्चेला बसा असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं.
"आरे कारशेड मेट्रो ३ साठी करत होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याला जंगल कमी करुन ही जागा वाढवावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता," असं मुख्यमंत्री म्हणाले.
कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
"आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु कांजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे," असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
"मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला.
आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही आपण वाढवली. कांजूरमार्गला आपल्याला ४० हेक्टर जागा मिळली होती. काजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या ३,४ आणि ६ या मार्गिकेंच्या कारशेड करता येणार होणार होत्या. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे अन्य लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?," असा सवालही त्यांनी यावेळी केला.