मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या सर्जरीनंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अनेक चर्चा सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. विरोधकांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला होता. यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती अतिशय तंदुरूस्त आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. "या अधिवेशनावर मुख्यमंत्र्यांचं चांगल्या प्रकारे लक्ष होतं, अत्यंत चांगल्या पद्धतीने टोले देत टोले घेत हे अधिवेशन पार पडलं. मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच ते पुन्हा कामकाज सांभाळतील" अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
पाठीच्या दुखण्यामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री अजून कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तर अधिवेशन काळात अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देत जा आणि उर्वरित वेळेत उद्धव ठाकरे काम पाहतील असा टोला देखील लगावला होता.