मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावती ते औरंगाबाद असा समृद्धी महामार्ग पाहणी दौरा केला. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आले असताना, समृद्धी महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी निदर्शन केली. मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासाठी हे शेतकरी आले असता, पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यास मज्जाव केला.
इतकंच नाही तर पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. महामार्ग होत असताना बाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी मार्ग न सोडता तिथे भिंत बांधली असल्याचा आरोपी केला आहे, शेतकऱ्यांच नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी..