मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे मांडलेल्या 12 मागण्या कोणत्या?

Update: 2021-06-08 08:51 GMT

आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.

या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मांडलेल्या मुद्यांबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी साधारण मोदींकडे 12 मागण्या केल्या आहेत.

एसईबीसी मराठा आरक्षण

इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण

मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण

मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे

राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई

पीक विमा योजना : बीड मॉडेल

बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे

१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक )

१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत

Tags:    

Similar News