राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी देखील सोबत आहेत. ते उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करु शकतात. तसंच सध्या राज्यात लावलेल्या लॉकडाऊन संदर्भात आणि कोव्हिड संदर्भात उच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या संदर्भात मुख्यमंत्री स्वत: मुख्य न्यायाधीशांची भेट घेण्यासाठी गेल्याचं समजतं. दरम्यान या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुख्यमंत्री गेल्या अर्ध्या तासापासून मुख्य न्यायाधिशांसोबत चर्चा सुरु असल्याचं समजतंय.दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आजच्या कार्यक्रमात ही भेट नसल्याचं समजतंय.