संभाजीनगर – विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता अधिवेशन संपल्यानंतरही हा वाद काही थांबण्याचा नाव घेईना. याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही आला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यानी निधी वाटपाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला. त्यांचं म्हणणं होतं की, विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्याला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्यावर समाधान न झाल्यानं अंबादास दानवे हे संदीपान भुमरेंच्या अंगावर धावून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.