उदय लळीत होणार देशाचे ४९ वे सरन्यायाधीश, पुन्हा एकदा सुत्र मराठी माणसाच्या हातात

Update: 2022-08-04 07:31 GMT

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल लागत असताना देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार हे देखील स्पष्ट झालं आहे. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश ए.व्ही.रमण्णा यांनी स्वतः बुधवारी ३ ऑगस्टला न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस असलेल्या पत्राची प्रत केंद्र सरकारकडे सोपवली. तीच प्रत त्यांनी गुरूवारी न्यायमुर्ती लळीत यांना देखील सुपूर्द केली.

केंद्रीय कायदे मंत्रालयाने बुधवारी सरन्यायाधीशांच्या सचिवालयासोबत सरन्यायाधीशपदासाठी पुढील उत्तराधिकारी निवडण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. यानंतर प्रथेप्रमाणे सरन्यायाधीश रमण्णा यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून यू. यू. लळीत यांच्या नावाची शिफारस केली.

एन. व्ही. रमणा या महिन्याच्या अखेरीस २६ ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती यु.यु. लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश म्हणुन काम पाहतील. त्यानंतर तेही निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील.

Tags:    

Similar News