रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत नागरिकांची गांधीगिरी

Update: 2021-09-12 06:51 GMT

राहुरी तालुक्यातील आरडगांव ते केंदळ या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत गांधीगिरी आंदोलन केले. दरम्यान या रस्त्याची तातडीने दुरुस्ती केली नाही तर आरडगांव सबस्टेशन येथे रस्ता खोदून रस्ता बंद केला जाईल असा इशारा उपस्थित युवकांनी दिला.

राहुरी तालुक्यातील पुर्व भागात दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जाणारा आरडगांव ते केंदळ रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत, सोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गांधीगिरी करत खड्ड्यात वृक्षारोपण केले आहे.

दरम्यान यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही तर शनिवारी आरडगांव सबस्टेशन येथे मुख्य रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदुन बंद करण्याचा इशारा यावेळी विशाल तारडे, हरिभाऊ डोंगरे, अविनाश यादव, सोमनाथ भांड, अच्युतराव बोरकर, जनार्दन तारडे, बापू भुुसे, पोपट तारडे, कृष्णा तारडे, बालु भुुसे, नवनाथ कैतके, चंद्रकांत तारडे, गणेश भांड, समीर तारडे, महेंद्र तारडे, उत्तम राऊत, रामेश्वर तारडे, ज्ञानदेव तारडे, संदीप पवार, रामेश्वर कैतके, सुनील भापकर, नामदेव कैतके, कचरू आढाव, सचिन धसाळ यांनी दिला आहे.

याबाबत राहुरीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असून प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबादार राहील असं सांगण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News