औरंगाबाद // औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी परिसरातील शासकीय निवासस्थाने पाडण्यात येणार असल्याच्या धास्तीने नागरिकांनी घर रिकामी करण्याला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सदरील घरे पाडण्यासाठी समितीची स्थापना केली असून,
त्या अनुषंगाने एक-दोन दिवसात सदरील निवासस्थाने पाडण्यात येतील असं सांगितले जात आहे. त्याच अनुषंगाने गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून येथे राहत असलेले माजी शासकीय कर्मचारी यांनी सदरील निवासस्थाने रिकामी करायला सुरुवात केली आहे. लेबर कॉलनीतील नागरिकांनी काही दिवसापासून उपोषण आणि आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यात त्यांना यश येताना दिसत नाही. आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची आढावा बैठक झाली असून सदरील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी निवासस्थाने पाडण्यासाठी समितीची स्थापना केली असून त्या अनुषंगाने दोन दिवसात येथील घरे पाडण्यात येतील त्यामुळे येथे राहत असलेल्या नागरिकांनी आपली घरे रिकामी करायला सुरुवात केली आहे, येथे शासकीय सेवेत असलेल्यांचे आई-वडील किंवा स्वतः चाळीस पन्नास वर्षापासून या घरात मध्ये राहत आहे आज सोडून जाताना दुःख होत आहे तरी आम्ही कुठे जावे शासनाने आमचाही विचार करावा अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.