मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आका वाल्मिकी कराड असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी करून त्यांचे संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धस यांनी सातत्याने आरोपाचे बॉम्बगोळे टाकायला सुरुवात केली आहे. धस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेतल्यानंतर मूळ खून प्रकरण राहिलं बाजूला मात्र भलत्याच गोष्टींवर चर्चेचा फोकस शिफ्ट झाला आहे. हे असे का व्हावे ? बीडमधला खरा 'आका' कोण आहे ? वाल्मिकी कराड कुठे दडून बसला आहे ? संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करतायत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर