औरंगाबाद – अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील शाब्दिक युद्ध काही थांबण्याचं नाव घेईना. त्यातच आता चित्रा वाघ यांनी उर्फीला कुठल्याही प्रकारची धमकी दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. यावर आता उर्फी काय प्रतिक्रिया देते, याविषयी उत्सुकता निर्माण झालीय.
चित्रा वाघ या सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या (Aurangabad) दौ-यावर आहेत. या दौ-यात पत्रकारांनी वाघ यांना उर्फी विषयी विचारणा केली. त्यावर वाघ म्हणाल्या, " उर्फी जावेदला मी कुठलीही धमकी दिली नाही. मी फक्त इशारा दिला आहे. महाराष्ट्रात असं नागडं फिरणं योग्य नाही आणि नागडं फिरू नको असं सांगणं म्हणजे धमकी आहे का असा प्रतिसवाल चित्रा वाघ यांनी केलाय. उर्फी ने महिला आयोगात (Woman Commission of Maharashtra ) तक्रार केली करू देत तक्रारी होत असतात. मात्र, आमचा आक्षेप फक्त उर्फी च्या कपड्यावर आहे, इतर गोष्टींवर नाही. त्यामुळे माझा अजूनही उर्फीला इशारा आहे की, तिने कपडे घालून रस्त्यावर फिरावं" असं चित्रा वाघ म्हणाल्या.