''अशा 56 नोटीशीत...'' चित्रा वाघ यांचे महिला आयोगाच्या नोटीसला प्रतिउत्तर

Update: 2023-01-07 05:50 GMT

मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उर्फी जावेद (Uorfi Javed) या तरुणीची जोरदार चर्चा आहे. उर्फी जावेद ही तिच्या हटके लुक मुळे वारंवार समाज माध्यमांवर चर्चेत असते. तिच्या याच हटके लुक वर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) संतापल्या आणि त्यांनी तिला अटक करण्याची मागणी केली. एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही. चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर उर्फी जावेद यांनी देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर या दोघांमधील हा वाद वाढत गेला आणि राज्याच्या राजकारणामध्ये चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांची चर्चा सुरू झाली.

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात जोरदार ट्विटर वॉर (Teitter War) रंगल्याचे सुद्धा पाहायला मिळालं. आता या वादावर अनेकांच्या प्रतिकिया आल्या आहेत. अनेकांनी चित्रा वाघ यांची तर अनेकांनी उर्फीची बाजू घेतली आहे... त्यानंतर चित्रा वाघ यांनी एक पत्रकार परिषदेत घेतली व त्यात त्यांनी थेट महिला आयोगाला (National Commission for Women) खडे बोल सुनावले. त्यांनी महिला आयोगाच्या कामावर आक्षेप घेतला.

त्यानंतर मग महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत दोन समुदायात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि महिला आयोगाचा आव्हान केल्याचा ठपका ठेवला. आता या नोटीस नंतर चित्रा वाघ यांनी सुद्धा महिला आयोगाला प्रत्युत्तर दिले आहे..

चित्रा वाघ यांचे महिला आयोगाला प्रत्युत्तर...


चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची नोटीस आल्यानंतर एक ट्विट केले आणि या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ''स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे.. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही…अशी भूमिका घेणारीला पाठवली… असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!

Tags:    

Similar News