राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे उर्फी जावेद. उर्फी जावेद (urfi javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh)यांच्यात पेटलेला वाद काही शांत होताना दिसत नाही आहे. हा सगळा वाद सुरू असताना आता उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar)यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
उर्फी जावेद ही सर्वत्र तिच्या हटके कपड्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. ती ज्या प्रकारचे कपडे घालते तिचा असा हा नंगाना चालू देणार नाही असा इशारा चित्रा वाघ यांनी तिला दिला होता. तिला अटक करण्याची देखील मागणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार देऊन त्यांनी केली होती. या सगळ्या दरम्यानच्या काळात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात जोरदार ट्विटरवॉर सुरूच होतं. हा सगळा वाद राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात सुद्धा एकमेकांवर टीका झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्या वादामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरू आहे? राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारून चित्रा वाघ यांना उर्फी जावेद हिचे कपडे हे महत्त्वाचे मुद्दे वाटतात का? असा खोचक सवाल सर्वसामान्य जनतेतून येऊ लागला. आता या वादाला नवीन वळण मिळविण्याची शक्यता आहे.
आज उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेणार असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहे. या भेटीदरम्यान उर्फी जावेद चित्रा वाघ यांची तक्रार महिला आयोगाकडे करू शकताते. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिचे थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. याच धमकीची तक्रार उर्फी जावेद आज महिला आयोगाकडे करू शकताते. त्यामुळे आज उर्फी जावेद यांनी रूपाली चाकणकर यांची भेट घेतली तर हा वाद नक्की कोणते वळण घेणार हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे...