15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आजपासून कोरोनाची लस दिली जाणार

देशभरातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आजपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे, याबाबत पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. लसीकरणासाठी तीन दिवसांआधीच कोविन अ‍ॅपवर नोंदणी सुरु झाली आहे.;

Update: 2022-01-03 04:28 GMT

मुंबई // देशभरातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना आजपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे, याबाबत पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. लसीकरणासाठी तीन दिवसांआधीच कोविन अ‍ॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक जणांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. या लसीकरणाच्या नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात आहे. आजपासून या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे.

CoWIN पोर्टलवर वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.

Tags:    

Similar News