मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर; महापूर बाधितांशी साधणार संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पूर परिस्थितीची पाहणी करून महापूर बाधितांशी साधणार संवाद साधणार आहेत.

Update: 2021-07-26 04:39 GMT

सातारा- राज्यात मागील 4 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास नऊ जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पाटण तालुक्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे .साताऱ्यात पुरबाधितांसाठी निवारा छावणी सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आजमुख्यमंत्री ठाकरे सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार असून, महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या छावणीला भेट देऊन पूर बाधितांशी संवाद साधणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून तालुक्यातील आंबेघर आणि मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून मुख्यमंत्री कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News