मुख्यमंत्री आपल्या दरे गावात आहेत. मंदिरात रात्री उशिरापर्यंत त्यांनी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शिंदेंनी नागरिकांच्या समस्या सोडवल्या.
अकल्पे, उचाट. निवळी, लामज, वाघवळे या गावांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांबू लागवडीचा प्रारंभ झाला. त्यानंतर ते आपल्या दरे गावात पोहोचल्यानंतर मंदिरात रात्री उशिरापर्यंत त्यांनी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविल्या. विशेष म्हणजे त्यांनी मोबाईल टॉवरच्या प्रकाशात हे कामकाज पाहिले. यावेळी जिल्ह्याचे अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा वेगळाच अंदाज नागरिक, शेतकऱ्यांप्रती अनुभवाय मिळत असल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांच्या या कामाच्या कौतुकही केले.