मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

Update: 2023-07-22 10:34 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिंदे यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, सून, नातू, वडील असा परिवार होता. पंतप्रधान मोदींनी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटी दिल्या.याआधी मंगळवारी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले

मुख्य़मंत्री एकनाथ शिंद्यानी अशी माहिती दिली की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी माझं संपूर्ण कुटुंब यावेळी माझ्यासोबत होतं. पंतप्रधानांना भेटल्याचं आनंद आणि समाधान वडिलांच्या चेहऱ्यावर होतं. पतंप्रधानांनी नातवासोबतही खूप गप्पा मारल्या," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

एकनाथ शिंदे सकाळी साडेअकराच्या सुमारास पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास दोन ते सव्वादोन तासांची ही भेट होती. पंतप्रधानांनी भेटीसाठी जास्त वेळ दिली होती. त्यासाठी त्यांचे आभार. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

इर्शाळवाडी येथील घटनेबाबत नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या. राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील मोदी यांनी जाणून घेतले. गृहमंत्री अमित शाह यांना देखील भेटणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News