मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले 45 उमेदवार; अमित ठाकरेंविरोधात हा शिलेदार

Update: 2024-10-22 19:30 GMT

शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांसारख्या प्रमुख नेत्यांना पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्याची संधि देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेंच्या विरोधात माहिममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी आहे.


याशिवाय, बंडात साथ दिलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी दिली आहे. संदीपान भुमरे यांच्या मुलाला देखील तिकीट मिळाले आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर तर उदय सामंत यांना रत्नागिरी येथून उमेदवारी दिली आहे.

जालन्यातून अर्जुन खोतकर, दर्यापूरमधून अभिजीत अडसूळ, सांगोला येथून शहाजी बापू पाटील, सावंतवाडीमधून दीपक केसारकर, पाटणमधून शंभुराज देसाई, मालेगाव बाह्य दादा भुसे या सारख्या बड्या नेत्यांना उमेदवारी दिले आहे. जे या यादीतील महत्त्वाचे उमेदवार आहेत. शिवसेनेच्या या यादीत विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची निवड केली गेली आहे, ज्यामध्ये नांदेड, बुलढाणा, जळगाव आणि रत्नागिरी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले 45 उमेदवार; अमित ठाकरेंविरोधात हा शिलेदारमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले 45 उमेदवार; अमित ठाकरेंविरोधात हा शिलेदार




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X समाज माध्यमांवर पोस्ट करत त्यांनी सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा दिल्या आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की,

"'जय महाराष्ट्र' हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.

सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा."

Tags:    

Similar News