Sharad Pawar | छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य भोसल्यांचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं- शरद पवार
नेहरु ते मोदी अशा पंतप्रधानांमुळं इस्त्रोला यश मिळाले चंद्रयान ३ संदर्भात शरद पवार यांच वक्तव्य
राष्ट्रवादीची आज कोल्हापूरात सभा पार पाडली. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी कंबर कसली आहे. नाशिक, बीड नंतर कोल्हापूरात हसनमुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवार यांनी शड्डू ठोकला आहे. मिळालेली सत्ता सामान्यांसाठी वापरायची असते हे कोल्हापूरनं आपल्याला सांगितलं असल्याचं वक्तव्य केलं
दरम्यान शरद पवार बोलत असताना म्हणाले की "छत्रपती शिवाजी महाराजांनी असं राज्य उभं केलं जे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. दुसरे एक राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता घेऊन सामाजाच्या बाजूनं राहिले. त्यांनी चुकीच्या गोष्टींना पाठींबा दिला नाही. तर ढोंगी लोकांना त्यांनी कधी संमती दिली नाही, भोंदूगिरीचा पुरस्कार शाहूंनी कधी केला नाही, ते म्हणजे शाहू महाराज, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांचा दाखला देताना भाजपवर निशाणा साधला.
यावेळी शरद पवार चंद्रयान ३ यशस्वी मोहीमेवर बोलत असताना म्हणाले की "या ऐतिहासिक घटनेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंपासून आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांचं योगदान होतं, त्यामुळं इस्त्रोला हे यश मिळालं,
पवार म्हणाले, "या सभेनिमित्त मला एका गोष्टीचं आनंद झाला, संपूर्ण जग काल संध्याकाळी चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार होतं, म्हणून तिकडं डोळे लावून बसले होते. ते उतरलं, एक ऐतिहासिक काम या देशातील वैज्ञानिकांनी करुन दाखवलं. या कामात महत्वाची भूमिका इस्त्रोनं केली. या इस्त्रोच्या स्थापनेची भूमिका जवाहरलाल नेहरुंची होती. त्यानंतर याच इस्त्रोसाठी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम यांच्यासह आजचे पंतप्रधान मोदी यांचंही योगदान महत्वाचं होतं"