ओबीसी मराठावाडा अधिवेशनात भुजबळ समर्थकांचा गोंधळ

Update: 2020-12-05 12:59 GMT

औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला मंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या दरम्यान एका वक्त्याने मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत अपशब्द वापरले असा आरोप करत समता परिषदेचे काही कार्यकर्ते व्यासपीठावर चढले आणि त्यांनी गोंधळ घातला. समता परिषदेच्या कार्यकर्त्याला यावेळी धक्काबुक्कीही झाली.

यानंतर विजय वडेट्टिवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालत छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले नसल्याचे सांगितले. तसंच अशाप्रकारे अंतर्गत वाद निर्माण करुन आपलेच नुकसान करुन घेऊ नका असे आवाहन केले.

Full View


Tags:    

Similar News