चवदार तळे सत्याग्रह दिन, गर्दी न करण्याचे आवाहन

Update: 2021-03-20 02:45 GMT

रायगड - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी प्राशन करून अखील मानव जातील पाण्याचा हक्क खुला केला. चवदार तळ्याचा हा सत्याग्रह दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा ओंजळभर पाणी प्राशन करून चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आंबेडकरी अनुयायी महाडला येतात. या निमित्ताने चवदार तळे परीसराला यात्रेचे स्वरूप येते. पण गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चवदार तळ्यावर येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. यावर्षी नियम आणि अटी घालून केवळ स्थानिकांना अभिवादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सभांना बंदी घालत गर्दी न करण्याचे अवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. चवदार तळे सत्याग्रहाच्या 94 व्या वर्धापन दिना निमित्ताने चवदार तळ्याच्या चहू बाजुने मनमोहक अशी विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News