चंद्रयान 3 लाइव्ह अपडेट: विक्रम लँडर संध्याकाळी 4 वाजता खालच्या कक्षेत प्रथम डीबूस्टिंग सुरू करेल.
चंद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेबद्दल एक मोठी अपडेट इस्रोकडून आले आहेत. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून १४ जुलै रोजी करण्यात आले होते, त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. आज चंद्रयान मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. भारताच्या लूनर एक्सप्लोरेशन (Lunar Exploration) प्रोग्रामने महत्वाचा टप्पा गाठला आहे. आपल्या देशाचे आता चंद्राभोवती तीन अंतराळयाने आहेत. त्याद्वारे भारताने या प्रोजेक्टमध्ये चीनला मागे टाकले आहे. या तीन अंतराळयानांद्वारे भारत अवकाश संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग ही इस्रोसाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरेल जी चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग प्रदर्शित करेल. चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण करून इस्रोने शुक्रवारी मोठी कामगिरी केली. यानंतर आता चंद्रयान चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. इस्रोची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल. २३ ऑगस्ट रोजी ‘विक्रम’च्या अवतरणाची (लँडिंग) सर्वाधिक अवघड क्रिया पार पडणार आहे.
चंद्रयान-3 चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी होऊ शकतं. बुधवारी सकाळी चांद्रयान 3 वर लँडिंगआधीच एक महत्त्वाच मॅन्यूव्हर परफॉर्म करण्यात आलं. चंद्रयान3 आता चंद्रापासूनच्या अत्यंत जवळच्या कक्षेत आहे. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडर मॉड्युल परस्परापासून वेगळे होण्यासाठी तयार आहेत.
चंद्रयान-3 चा फायदा अमेरिकेला
आता नासाची चंद्र मोहीम आर्टेमिस मिशन 2025 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेचा फायदा नासाच्या आर्टेमिस मिशनला होणार आहे. चांद्रयान-3 चा डेटा भविष्यातील मानवी लँडिंगसाठी उपयुक्त ठरेल, असा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. भारताने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे. ज्याद्वारे भारतीय चंद्र मोहिमेशी संबंधित माहिती अमेरिकन मिशनसाठी देण्यात येईल.