ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का? चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर ट्रोल

Update: 2021-04-24 05:05 GMT

राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परराज्यातून ऑक्सिजन विमानाने आणण्याची परवानगी मागितली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली होती.

"ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का? हे मला काही कळतच नाही. तो महाराष्ट्रात निर्माण करावा लागेल. मात्र मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला आलेत. मात्र, पवार साहेबांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केलंय. पूर्वीच्या काळात राजे ज्या पद्धतीने वेष बदलून जनतेत फिरत होते तसं उद्धव ठाकरे यांनी पीपीई किट घालून फिरलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना जनतेचे प्रश्न कळणार नाहीत."असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

विमानाने ऑक्सिजनची वाहतूक ऑक्सिजन मिळत असल्याने अनेक लोकांचा जीव धोक्यात येत आहे. ही बाब लक्षात घेता लवकरात लवकर ऑक्सिजन मिळावा. म्हणून हवाई दलाने वाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वायू सेने च्या C-17 आणि IL-76 विमानांचा वापर केला जात आहे. यामुळे देशाच्या मोठ मोठ्या शहरांमध्ये विमानाने ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.

वायू सेनेने हिंडन स्टेशनवर आज क्रायोजेनिक ऑक्सिजन असलेला एक टॅंकर एअरलिफ्ट केला तो टॅंकर पानागड येथे नेण्यात येणार आहे. पूर्ण देशात विमानाने वायू दल ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे. चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर ट्रोल शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केलं असून या ट्वीटमधून त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्वीट वर अनेक लोकांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

Tags:    

Similar News