आम्ही पण तुमचे बाप आहोत : चंद्रकांत पाटील
आम्ही पण तुमचे बाप आहोत, चंद्रकांत पाटील यांचा अजित पवार यांना टोला...;
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन वाकयुद्ध रंगलं आहे. पुणे महापालिकेच्या १६ प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आम्ही पण तुमचे बाप आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. या निवडणूकीत भाजपला 16 पैकी ११ जागा मिळाल्या. त्यावेळी ते बोलते... काय म्हटलंय चंद्रकांत पाटील यांनी...
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर राज्यकर्ता कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले आहे. भाजपचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि २०१९ च्या निवडणुकीत ३०३ खासदार निवडून आले आहेत. सहयोगी खासदारांची संख्याही वाढली आहे. आपण एका मोठ्या पक्षाचे सदस्य आहेत. महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत ११ ठिकाणी भाजपचे अध्यक्ष निवडून आले आहेत. उर्वरित चारपैकी एका ठिकाणी टॉस झाला आणि ती जागा भाजपला मिळाली नाही. काही तरी जादू करून सर्वच्या सर्व जागांवर भाजपचे अध्यक्ष झाले पाहिजेत, असे मी म्हणत होतो. मात्र, तसे झाले नाही. अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्ने पडत आहेत. परंतु, त्यांनी जादा ऊर्जा वाया घालवू नये, आम्हीदेखील अजित पवार यांचे बाप आहोत,' अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.