परमबीर सिंह यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
Chandiwal commission issues bailable warrant against Param Bir Singh परमबीर सिंह यांना अटक होणार का?;
खंडणीच्या विविध तक्रारी दाखल झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची होमगार्डच्या महासंचालक पदी बदली केल्यानंतर परमबीरसिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश के.यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे.
मात्र, या आयोगाने वारंवार नोटीस बजावून देखील परमबीर सिंह उपस्थित न राहिल्याने परमबीर सिंह यांना आयोगाने त्यांना एकदा 25 हजार रूपये असा दंड देखील ठोठावलेला आहे. तरीही परमबीर सिंह उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविरोधात आ अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. त्यामुळं आता परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह यांना अटक होणार का?
दरम्यान या निमित्ताने परमबीर सिंह यांना अटक होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. चांदीवाल आयोगाने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या पोलील महासंचालकांना एका जेष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळं आता परमबीर सिंह यांना आयोगासमोर हजर होऊन जामीन मिळवावा लागणार आहे.
Param Bir Singh News Inquiry, Mumbai Police, Param Bir Singh, Commission Mumbai