राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार.
मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.;
मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिराउन घेतला होता. आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ७ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार गुरूवारी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र,मराठवाड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. शुक्रवार, शनीवारी पाऊस पडू शकतो. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. ही परिस्थिती पूर्ववत होण्यापूर्वीच पुन्हा एकदा शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.