वर्षाअखेर राज्यात जोरदार पावसाची शक्यता ; मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऐन हिवाळ्यात वर्षाअखेर राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढली आहे. राज्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Update: 2021-12-26 04:45 GMT

नागपूर // ऐन हिवाळ्यात वर्षाअखेर राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढली आहे. राज्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

आजपासून वायव्य भारतावर व उद्यापासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात २८ आणि २९ डिसेंबरला मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानुसार हवामान विभागाने मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. जालना, परभणी, यवतमाळ, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली,गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत २९ डिसेंबरला पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, ऐन हिवाळ्यात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं. विदर्भ, मराठवाड्यातही पावसांमुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.

Tags:    

Similar News