केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज पोलीस अधीक्षक कार्यालयात हजेरी , कडेकोट पोलिस बंदोबस्त

नारायण राणे पोलिस चौकशीसाठी आज पोलिस चौकशीसाठी अलिबागमधे येणार आहेत.;

Update: 2021-09-13 06:32 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागात हजेरीसाठी उपस्थित राहणार आहेत. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दि .(23 ) ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केल्यानंतर रायगड पोलिसांकडे दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. 31 ऑगस्ट 2021 रोजी नारायण राणे यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगून वकिलांमार्फत पोलीस स्थानकात म्हणणे मांडले होते. आज 13 सप्टेंबर रोजी दुसरी हजेरी असून नारायण राणे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागात हजर राहणार आहेत. यादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यादृष्टीने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या 200 मीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आ

Similar News