कोरोना वार्डाच्या आवारातच जल्लोषात वाढदिवस साजरा

घाटीतील मेडिसीन विभागातच कोरोना नियमांना पायी तुडवत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे समोर आले आहे.;

Update: 2021-06-04 03:37 GMT

औरंगाबाद: रुग्ण कमी झाले असले तरीही धोका अजुन टळलेला नाही असं,मुख्यमंत्री वारंवार सांगतायत. मात्र औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे, त्या घाटीतील मेडिसीन विभागातच कोरोना नियमांना पायी तुडवत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी मेडिसीन विभागातील एका कर्मचाऱ्यांचा वाढदिवस होता, मग काय मोठा हार,केक आणि कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. यावेळी सोशल डिस्टन्स तर सोडा अनेकांनी मास्क सुद्धा लावला नव्हता. नुसताच वाढदिवस साजरा झाला नाही, या ठिकाणी फुलांचा मोठा हार आणि पाकळ्यांची उधळण सुद्धा करण्यात आल्याने पाकळ्यांचा खच पडला होता.

घाटीबाहेरचे व्यक्ती सुद्धा हजर

या वाढदिवसाला फक्त घाटीतील कर्मचारीच नव्हे तर, घाटीशी संबंधित नसलेले बाहेरची व्यक्ती ही उपस्थित होते. मेडिसीन विभागाला विशेष असे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले असून, त्यांचा 24 तास खडा पहारा असतो. मग असं असतानाही बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश कसा देण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:    

Similar News