अनिल देशमुख यांना CBI ची क्लीन चीट? सीबीआयचं स्पष्टीकरण

Update: 2021-08-29 12:19 GMT

अनिल देशमुख यांना CBI ने क्लीन चीट दिल्याच्या बातम्या सध्या येत असताना सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, व्हायरल झालेले पत्र खोटं असल्याचं या स्पष्टीकरणात म्हटलेलं नाही. मुंबई चे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला होता.

देशातील विविध माध्यमांवर अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात एक वृत्त प्रसारीत करण्यात आलं होतं.

आत्तापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत देशमुख यांच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नसल्याने त्यांच्याविरोधातले आरोप सिद्ध होत नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांची चौकशी थांबवण्यात यावी, तसंच पुढची कारवाईसुद्धा थांबवावी, असेही सीबीआयच्या प्राथमिक अहवालात म्हटले असल्याचे या बातमीमध्ये सांगण्यात आलं होतं. त्यावर सीबीआयने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमूख सीबीआय चौकशीत निर्दोष आढळल्याचं एका कथीत अहवालावरून माध्यमांनी दिलं आहे.

सीबीआयचं स्पष्टीकरण...

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत आम्हाला अनेक प्रश्नांची विचारणा होत आहे. त्यामुळे वस्तुस्थिती आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. मुंबई हायकोर्टात या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध याचिका दाखल होत्या. त्यावरून हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले होते. ही चौकशी आम्ही केली व त्यात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीबीआयने २१ एप्रिल रोजी एफआयआर दाखल केला आहे आणि त्याची प्रत २४ एप्रिलपासून सीबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे.

एकंदरीतच सीबीआयने लिक झालेले पत्र खोटं आहे असं म्हटलेले नाही. मात्र, चौकशी सुरू आहे असं म्हटलेले आहे. त्यामुळं अनिल देशमुख यांना त्या अहवालात क्लीन चीट मिळाली होती का? तरीही सीबीआयने पुढे कारवाई केली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

Tags:    

Similar News