नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणी ११ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल...
अमारावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ कर्मचाऱ्यांवर पावणे दोन कोटी रुपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या ११ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.;
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्य व बेकायदेशीरपणे एक कोटी 87 लाख 67 हजार 182 रुपयाचे कर्ज वाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महागाव तालुक्यातील हिवरा शाखेमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून ११ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीचे नाव रविंद्र रुपराव महानुर असून, फिर्यादी हे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक मर्या. हिवरा शाखा येथे व्यवस्थापक आहेत. या घटनेनंतर त्यांनी याप्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात येत आहे.