राजेश टोपेंना हरामखोर म्हणणारे बबनराव लोणीकर गोत्यात, गुन्हा दाखल

Update: 2021-11-21 04:50 GMT

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं भाजप नेते बबनराव लोणीकरांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे.कारण याप्रकरणी लोणीकर यांच्याविरोधात आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांनी जालन्यातील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता जालन्यातील जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अतिवृष्टीचं नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारवर टीका करतांना टोपे यांना हरामखोर म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तर टोपे यांना लोणीकर यांनी हरामखोर म्हणाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, राष्ट्रवादीचे स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. त्यामुळे काही ठिकाणी निदर्शने करत लोणीकर यांच्याविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. तसेच लोणीकर यांच्यावर आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News