34 वर्षे राज्य करणाऱ्या डाव्या सरकारच्या विरोधात 2011 मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 पैकी 34 जागा जिंकून राज्यात आपले अस्तित्व प्रस्थापित केले होते. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकून सर्वांना चकित केले. 2024 च्या निवडणुकीत एनडीएसाठी 400 चा आकडा पार करण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपला 2019 प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवता येईल का?