पट्टीवडगाव सर्कल मधून प्रचारास प्रारंभ; 2002 ची होणार पुनरावृत्ती...?
"ज्याला तुम्ही निर्माण केले त्याला कोणी संपवण्याचे आव्हान देत असेल तर त्याला 20 नोव्हेंबर रोजी मतातून दाखवून द्या" - धनंजय मुंडेंचे पट्टीवडगाव सर्कल येथील मतदारांना आवाहन;
पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातील बागझरी येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन आरती करत आज धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. धनंजय मुंडे यांनी सर्वात पहिल्यांदा लढवलेल्या 2002 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा प्रचाराचा शुभारंभ त्यांनी बागझरीच्या याच दत्त मंदिरात दर्शन घेऊन केला होता. धनंजय मुंडेंच्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात बागझरी येथील दत्त मंदिराच्या दर्शनाने होत असते.
मुंडे कुटुंबाच्या दोन पिढ्या तुमच्या सर्वांची सेवा करण्यात गेल्या. आजही आम्हाला सेवेची संधी मिळते ती तुमच्याच आशीर्वादाने, आपण मतदारसंघात विकासासाठी दिलेला प्रत्यक्ष शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणात विकास निधी खेचून आणला.
मात्र देशाचे काही उच्चपदस्थ नेते माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्हीच मला तुमच्या आशीर्वादाने आज पर्यंत इथवर आणले आहे. त्याला तुम्हीच निर्माण केले आज त्यालाच संपवण्याची भाषा केली जात असेल किंबहुना तसे आव्हान दिले जात असेल तर अशा लोकांना 20 नोव्हेंबर रोजी मतदानातून तुम्ही दाखवून द्या असे आवाहन यावेळी बागझरी व परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी केले.
मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही ज्या दिवशी जात बघून किंवा जात दाखवून मतदान मागायची माझ्यावर पाळी येईल त्या दिवशी मी राजकारण सोडून देईल. कोरोना काळात केलेली मदत आठवा त्यावेळी सुद्धा आपण सर्वांना सोबत घेऊन आपल्याकडून जी शक्य ती सर्व मदत केली. तेव्हा आता तुम्ही स्वतः उमेदवार आहेत असे समजून तुम्ही कामाला लागा असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी विश्वंभर फड, गणेश कराड, बबन मुंडे, लिंबराज लहाने,विनोद लहान, प्रशांत दहिफळे, माने सर, धनंजय सोळंके यांसह आदी उपस्थित होते.