आंध्रप्रदेशमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कालव्यात कोसळली ; 9 प्रवाशांचा मृत्यू

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-12-15 12:24 GMT
आंध्रप्रदेशमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कालव्यात कोसळली ; 9  प्रवाशांचा मृत्यू
  • whatsapp icon

आंध्र प्रदेश : आंध्रप्रदेशमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कालव्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात अश्वरावपेटा ते जग्गारेड्डी गुडम दरम्यान असलेल्या मार्गावरुन जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस कालव्यामध्ये कोसळली. मृतांमध्ये पाच महिलासह चार मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आणखी काही प्रवासी बेपत्ता असुन शोधमोहीम सुरू आहे. काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News