संभाजीनगर (औरंगाबाद)जिल्ह्यातील वेरूळ लेणी क्रमांक १० मधील किरणोत्सव वर्षातून फक्त एकदाच दोन दिवसात ( १० आणि ११ मार्च ) पाहू शकतो. प्राचीन काळातील स्थापत्य विशारदांनी हा नेत्रदीपक नैसर्गिक सोहळा आपल्याला अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जगविख्यात वेरूळ लेणी समूहात स्थापत्य आणि खगोलशास्त्राचा अनुपम नेत्रदीपक नैसर्गिक सोहळा लेणी क्रमांक १० मध्ये चैत्यगृह असलेल्या या लेणीतील चैत्य गवक्षातून उत्तरयानातील किरणोतस्व वर्षातून एकदाच दोन दिवसांच्या करता सम्यक संबुध्द यांच्या मूर्तीवर पडतात १० मार्च आणि ११ मार्चाला सूर्य किरणांचा स्पर्श बुध्दामंच्या मूर्तीला करतात जणू काही एक तेजाचे दुसर्या तेजाच्या भेटीचा हा प्रसंग आपल्याला आपल्या नेत्रांच्या द्वारे मनाची कुपीत साठवून ठेवण्याची व्यवस्था प्राचीन काळातील आदरणीय भदंतांनी करून ठेवली आहे.आज ही आपण हा किरणोतस्व अनुपम नेत्रदीपक नैसर्गिक सोहळा पाहू शकतो तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ४.३० ते ५.१५ या वेळेत वेरूळ लेणी क्रमांक १० मध्ये उपस्थित रहा, असे आवाहन लेणी संवर्धक अभ्यासक सूरज रतन जगताप यांनी केले आहे.
https://youtu.be/iozT2dx7jfU?t=4