हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण अनेक अर्थांनी खास होते. कारण सुपरमून,ब्लड मून आणि पूर्ण चंद्रग्रहण एकाच वेळी दिसले. चंद्रग्रहणामुळे अवकाशात चंद्राचा मनमोहक नजारा पहायला मिळाला.चंद्र प्रेमींसाठी चंद्रग्रहण महत्त्वाचे ठरले आहे. चंद्रग्रहणाच्या जगभरातील सुंदर आणि मनमोहक छटा समोर आल्या. ऑस्ट्रेलिया,पॅसिफिक आणि अमेरिकेत चंद्राचे सुंदर रुप होते. अनेकांनी चंद्राचे फोटो टिपले आहेत.
२६ मेला सुपरमून म्हणजेच संपूर्ण चंद्रग्रहण(lunar eclipse) होते. २६ मेला चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असेल ज्यामुळे हे सुपरमून ग्रहण(complete lunar eclipse) असेल ज्यामुळे चंद्र संपूर्ण लाल दिसेल. याला ब्लड मूनही(Red Blood Moon) म्हटले जाते. जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या चारही बाजूला एका अंडाकार कक्षेत फिरत असतो तेव्हा तो दर महिन्याला पृ्थ्वीचा जवळचा बिंदू आणि पृथ्वीच्या सगळ्यात दूरच्या बिंदूजवळून गेला.