'BSNL' मध्ये पगाराचे वांदे

Update: 2022-01-13 04:25 GMT

देशातील सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या BSNL समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याने पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकले नाहीत.

2014 पासून मोदी सरकार सत्तेत आल्या नंतर सातत्याने सरकारी कंपन्यांची विक्री झाली आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांना प्रोत्साहन देऊन सरकारी बीएसएनएल आणि एमटीएनल कंपन्यांचे खच्चीकरण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक लाख 70 हजार कर्मचारी असलेल्या BSNL संस्थेचे देशभर कर्मचार्‍यांचे जाळे आहे.

गेल्या काही दिवसात खासगी दूरसंचार कंपन्यांकडून मोठ्या स्पर्धेशी BSNL झुंजत आहे. BSNL चा इतिहासामध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा संपलेल्या महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात पहिल्या दिवशी पगार होत होते. दहा दिवस उलटल्यानंतरही कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकले नाहीत. कंपनी पुढे मोठे आर्थिक संकट असल्यानेच पगार होऊ शकलं होत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी MTNL या सरकारी कंपनी पुढे असेच आर्थिक संकट उभे राहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वेच्छानिवृत्ती धोरण राबवून खर्च कपात करण्यात आली होती.

Tags:    

Similar News